सई

आज मराठी कविता सादर करतोय.

भर दुपारच्या उन्हात एक मंद झुळूक येवून जेव्हा बहार आणते तेव्हा ही कविता येते. त्या मैत्रिणीसारखी, अकस्मात, भिरभिर गिरक्या घालत. जेव्हा आपल्याला तिची गरज वाटते, तिचा हात हातात घेवून, गप्पा माराव्या आणि एकदाच मन मोकळं करून टाकावं. ती मैत्रीण, त्या सई साठी.

सई..

 

रित्या मनातली कळी झाली

रानातले फुल झाली

दुपारच्या उन्हात ती बहर आली

सायंकाळची मंद झुळूक

ती सई माझी,

माझी कविता झाली

 

आठवण तिची तिच्यासारखीच आली

नकळतच मनाच्या अंगणात आली

वारंवार झोके घेऊ लागली

मंद सुगंध होवून

ती सई माझी,

माझी कविता झाली

 

ती निरागस तिची सादगी

दवबिंदु जसे मंगल प्रहरी

ना घोस ना ओस

सरसर बरसणाऱ्या अल्हाद सरी

पावसानंतरची संध्या ती

ती सई माझी,

माझी कविता झाली

(Picture Courtesy: MyIndianPictures, Vivek Mahure)

girl-enjoying-the-rain-cool

Advertisements

One thought on “सई

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s