लिखाण.. कविता, लघुनिबंध, मराठी, हिंदी.. हे सर्व कशासाठी? “स्वांतः सुखाय..” हा एक हेतू संपला तर एकच प्रश्न, “पुढे काय?” मग जे आपल्याकडे आहे ते इतरांपर्यंत पोचवावे. आणि इतर म्हणजे कोण? तुम्ही, म्हणजे आपण सर्व, जे काही ते. तुमच्यासोबत जडलेला हा आपलेपणा सोडवत नाही, मग हा शब्दसाठा माझ्याकडे ठेवून मी काय करायचं? म्हणून, हा लेखनप्रपंच विस्तृत करतोय. आपल्यापर्यंत पोचवतोय.

प्रत्येकाचे काही गुण-वैशिष्ट्य असतात आणि ते नैसर्गिक आहे. त्या नकारात्मक असल्यास वृत्ती किंवा विकृती बनतात. सकारात्मकपणे त्यावर चिंतन करून कलाकार त्यामधून आपली कला व्यक्त करतो.

आपोआप काहीतरी संचारते, काही शक्ती, काही तत्व. खऱ्या कलाकाराला याची जाण असते.

अशी सहजपणे घडत जाते तेव्हाच ती कला उत्कृष्ट ठरते. सर्वांची हीच कहाणी, मग ती चित्रकाराच्या कुंचल्याची असो वा लेखकाच्या लेखणीची.

अशीच सहजपणे, आपल्याच प्रेमाच्या प्रेरणेतून माझ्यात ती प्रतिभा संचारली आणि तुमचेच ते सर्व काही माझ्या लेखणीद्वारे कागदावर पहिल्यांदा उतरले. सर्व काही तुमचेच आणि तुम्हालाच समर्पित. मी फक्त निमित्तमात्र.

आधी मराठी, थोड्या बालिशपणे आणि श्रवण करत करत मग हिंदी कविता आपोआप रचत गेल्या. ज्या काही भावभावना आहेत त्यांना वाहायला वाट मिळाली. आप्त-मित्रांकडून भरपूर प्रेम मिळाले.

याला व्यासपीठ मिळावं हाच शोध सुरु होता. म्हणून याद्वारे आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

चरणी समर्पित.

Advertisements